Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

वंचित बहुजन युवा आघाडीच्या लढ्याला यश; फ्लिपकार्ट व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


खडकवासला :- खडकवासला येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत.


पेट्रोल दरवाढीनुसार भत्त्याचे नियमित पुनर्निर्धारण करावे, या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या फ्लिपकार्टच्या 17 डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी बंद करण्यात आल्या होत्या. वारंवार विचारणा करूनही संबंधित कर्मचाऱ्यांच्या आयडी पुन्हा सुरू करण्यास फ्लिपकार्ट व्यवस्थापन तयार नव्हते. त्यामुळे संबंधित कामगारांनी वंचित बहुजन युवा आघाडी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि महासचिव गौतम तायडे यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी येथील फ्लिपकार्ट स्टोअरला भेट देऊन व्यवस्थापकाला जाब विचारला.


वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर व्यवस्थापनाने 17 डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी तात्काळ सुरू करून विविध मागण्या मान्य केल्या.


यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अमोल बावस्कर, उपाध्यक्ष आनंद ढेंबरे, महासचिव गौतम तायडे, विकी खंडागळे तसेच मोठ्या संख्येने डिलिव्हरी कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments