Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पंचशील ध्वज विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार!




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


नांदेड :- नांदेड येथील लोहा जायकवाडी वसाहतीतील पंचशील ध्वज व विश्वशांती बौद्ध विहाराचा नामफलक काढून टाकल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोहा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती नांदेड जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी त्रिरत्न बौद्ध विहार येथे आयोजित बैठकीत दिली.


जायकवाडी वसाहतीमध्ये मागील ३५ वर्षांपासून असलेला पंचशील ध्वज व नामफलक काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी काढून टाकला. याप्रकरणी ध्वज पूर्ववत उभारण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने समाजाच्या भावना लक्षात घेऊन आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी सांगितले.


बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments