Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

माहुर तहसील कार्यालया समोर माकप व किसान सभेची निदर्शने.शासनादेशाची ही होळी




माहूर प्रतिनिधी 

आदित्य खंदारे 


माकपा व किसान सभेने गुरुवार दि. 11 जून रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन शासनादेशाची होळी केली.यावेळी शासनाच्या धोरणा विरोधात देण्यात आलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दनाणून गेला होता.

माकपा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालया समोर केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून  शेतकरी कर्जमाफीतील सर्व जाचक अटीशर्ती रद्द करा, सर्व राबणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, देवस्थान जमीन विधेयकाची स्थगिती रद्द करा, देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्वरित करा व माहुर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करा या मुख्य मागण्या करण्यात आल्या.  या आंदोलनाचे नेतृत्व 

अखिल भारतीय किसान सभेचे सहसचिव कॉ. शंकर सिडाम व जिल्हा सचिव किशोर पवार यांनी केले. कॉ.संजय मानकर,डॉ.बाबा डाखोरे,प्रसराम पारडे,शंकर गंदमवार,दिगांबर आगीरकर,डॉ.शुभा डाखोरे,राजु पिसरवाड,सुभाष डाखोरे, गणपत राठोड,प्रेमसींग चव्हाण,किसन जगदाळे, वसंत चव्हाण,विजय पिसरवार यांचेसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments