Type Here to Get Search Results !

बिबट्याने गोठत्यात शिरून केला हल्ला , पाडला तीन वगारीचा फडशा!




रामपूर (आंबागड ) येथील शेतकरी पशुपालकांमध्ये पसरले भितीचे वातावरण!


✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847 /8888519894


भंडारा :- (दिनांक १६ जून २०२६) भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर ( आंबागड ) शिवारातील तीन शेतकर्यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या मशीच्या वगारावर हल्ला करीत बिबट्याने फडशा पाडल्या आहेत.  या घटनेने शेतकरी पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरात तीन चार दिवसापासून बबट्याचा मुक्त संचार वाढला असून शेतकरी शेतात जाणार कशा ? अशा प्रश्न शेतकच्यांपूढे पडला आहे. 


बिबट्याला पिंजरा लाऊन पकडण्यात यावे , अशी मागणी शेतकर्यांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे. शेतकरी जयलाल लिल्हारे , कुंवरलाल लिल्हारे , शोभेलाल लिल्हारे यांनी गावालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यात नेहमी प्रमाणे रविवारी सायंकाळी त्यांनी म्हशी गाय , वगार गोठ्यात बांधून घरी गेले. दिनांक १४ जून च्या मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून गोठ्यातील तीन वगाराचा फडशा पाडला. ही घटना सोमवारी दि. १५ जून च्या सकाळी उघडकीस आली.  बिबट्याने हल्ला केल्याने लिल्हारे कुटूंबाचे किमान ३० ते ४० हजाराचे नुकसान झाले आहे.


बिबट्याने एका वगारीला अर्धा की.मी. मीटर पडकळत नेले असून बिबट्या ठिय्या मारून बोस मध्ये बसला होता. वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव केल्यानंतर बिबट्याचे पायाचे ठसे दिसुन आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.


रामपूर , सिहरी , ताडगाव शिवाराच्या राणावनात गुरे , शेळी , मेंढपाळ व पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून   बिबट्याच्या हल्याने धास्तावले आहे. लवकरात लवकर पिंजरा लाऊन ड्रोनच्या सहाय्याने बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments