Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मोहाडी नगर पंचायत कर वाढ व भ्रष्टाचार प्रकरणी नगर विकास संघर्ष समितीची मंत्रालयात धाव!




✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा मो. नं.9373472847 / 8888519894


भंडारा :- ( दिनांक १६ जून २०२६ ) मोहाडी नगर पंचायतच्या कर वाढीविरोधात तसेच कथित भ्रष्टाचार प्रकरणी नगर विकास संघर्ष समितीने थेट मंत्रालयात धाव घेतली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगर विकास विभागाचे अप्पर सचिव आणि मा. Eknath Shinde यांचे स्वीय सचिव यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली.

या प्रकरणात Bacchu Kadu यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याचे समितीने सांगितले. घरकर (हाऊस टॅक्स) वाढीबाबत मंत्रालयात प्रकरण सुरू असताना नगर विकास संघर्ष समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, या प्रयत्नांना निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.

तसेच, नगर पंचायतमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणातही लवकरच महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. मंत्रालयात सादर करण्यात आलेले सबळ पुरावे आणि झालेली चर्चा यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल, असा दावा करण्यात आला.

आमदार बच्चू कडू यांची मिळालेली मदत मोहाडीतील नागरिकांसाठी दिलासादायक ठरेल, अशी भावना नगर विकास संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. मोहाडी नगर पंचायतमधील कर वाढ आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत पुढील प्रशासनिक कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. नगर विकास संघर्ष समिती चे बबलू सैय्यद,पुरुषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, अंशू सैय्यद यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments