Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर




समाजसेवा, अध्यात्म, मानवकल्याण आणि जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांना दैनिक मराठीबाना वृत्तपत्राच्या वतीने प्रतिष्ठेचा "जीवन गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण आज दि. १४ जून २०२६ रोजी राष्ट्रसंत साईनाथ महाराज यांना देण्यात आले.


यावेळी दैनिक मराठीबाना चे माहूर तालुका प्रतिनिधी आदीत्य खंदारे तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय घोगरे यांनी आश्रमात भेट घेऊन पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रण पत्र साईनाथ महाराज यांना सुपूर्द केले. या प्रसंगी उपस्थितांनी महाराजांच्या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले.


राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी अनेक वर्षांपासून समाजातील सर्व घटकांसाठी निस्वार्थ सेवा, अन्नदान, धर्मप्रबोधन, व्यसनमुक्ती जनजागृती तसेच मानवतेचा संदेश देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यांच्या या बहुमोल योगदानाची दखल घेत दैनिक मराठीबाना परिवाराने त्यांना "जीवन गौरव पुरस्कार" देण्याचा निर्णय घेतला आहे.


हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या अनुयायी, भक्तगण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आनंद व्यक्त करण्यात येत असून महाराजांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments