मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- शिवसेना पक्षप्रमुख मा श्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मागर्दर्शनातं तसेच चंद्रपूर शिवसेना श्री संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आपणास निवेदन देण्यात येत आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाली असून महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खत, बियाणे, औषधे व शेतीसाठी लागणाऱ्या इतर साहित्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. तसेच शिक्षण शुल्कात झालेल्या वाढीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
यासोबतच ग्रामीण व शहरी भागात सक्तीने बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात वाढ होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवून या योजनेचा फेरविचार करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे.
आमच्या प्रमुख मागण्या
पुढीलप्रमाणे :
1)इंधन दरवाढ तात्काळ कमी करण्यात यावी.
2)महागाई नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात.
3)शेतमालाला हमीभावासह योग्य बाजारभाव मिळावा.
4)खत, बियाणे व कृषी निविष्ठांच्या किमती कमी करण्यात याव्यात.
5)शिक्षण शुल्कवाढीवर नियंत्रण आणावे.
6)सक्तीची स्मार्ट मीटर योजना तात्काळ स्थगित करून नागरिकांच्या तक्रारींची चौकशी करावी.
7)सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा.
8) नीट (NEET) व इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
9) पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या या गंभीर खेळाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
10) भविष्यात कोणत्याही शासकीय अथवा स्पर्धा परीक्षेत गैरप्रकार होणार नाहीत यासाठी पारदर्शक व विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
या मोर्चा साठी चंद्रपूर च नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शिव सैनिक एकत्र येऊन मोर्चात सहभागी झाला.

Post a Comment
0 Comments