Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान देवमलरी कार्यालय




व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 

मो. 9209982212


अहेरी :-  मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत देवलमरी ग्रामपंचायत कार्यालयात मूल्यांकन पडताळणी समितीच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. विभागीय सहाय्यक आयुक्त तथा चौकशी अधिकारी श्री. संतोष राऊत यांनी आपल्या पथकासह ग्रामपंचायत देवलमरी येथे भेट देऊन अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.

या भेटीदरम्यान ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांची तसेच संबंधित दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. याशिवाय जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, आठवडी बाजारपेठेची जागा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन व पडताळणी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी देवलमरी ग्रामपंचायतचे प्रशासक श्री. लक्ष्मण कन्नाके, प्रशासकीय समिती सदस्य तथा राम राम महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सालय्या कंबलवार, ग्रामपंचायत अधिकारी कु. एम. ए. दुर्वे, ग्रामपंचायत अधिकारी श्री. झाडे, लिपिक कमलाकर गद्देपाकवार, राकेश कुर्री, बबन पठाण, मोबिलायझर गंगुबाई सोयाम तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त तथा चौकशी अधिकारी श्री. संतोष राऊत यांनी अभियान कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

Post a Comment

0 Comments