मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
नागपूर :- अनुसूचित जाती उपवर्गीकरण निषेध मोर्चा...
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाच्या विरोधात सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी, संजीवनी सखी संघ, तसेच विदर्भातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका स्तरावरील आंबेडकरवादी, बुद्धीस्ट, इतरही समाजातील संघटना सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चाद्वारे उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा दरम्यान उपस्थित वक्त्यांनी भारतीय संविधानाने दिलेल्या समान हक्कांचे रक्षण करण्याचे आव्हान केले. समाजातील एकता, बंधुता आणि सामाजिक न्याय अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली.
"संविधान वाचवा, आरक्षण वाचवा" या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चा शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने दीक्षाभूमी ते संविधान चौक येथे नेण्यात आला.
शेवटी संबंधित प्रशासनाला मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.

Post a Comment
0 Comments