Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महावीर भवन, हिंगोली येथे शिवसैनिक कार्यकर्ता मेळावा संपन्न




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


हिंगोली :- मराठवाड्याच्या भूमीला लागलेला गद्दारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी, शिवसैनिकांची निष्ठाच पुरेशी आहे, एकजुटीने लढूया; अशी साद आज पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हिंगोलीवासियांना घातली. ह्या कार्यकर्ता मेळाव्यात निष्ठावंत शिवसैनिकांचा प्रचंड उत्साह दिसला. हाच उत्साह आणि विश्वास संघटनेला अधिक बळकटी देईल.


ह्या कार्यकर्ता मेळाव्यास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे,  आमदार नितीन देशमुख, आमदार संजय देरकर, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार गजानन लवटे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments