संतोषी माता नगर, अंबिकानगर येथे वंचितची “जनतेसाठी पाणी सेवा”
मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
औरंगाबाद :- औरंगाबाद शहरातील नागरिक गेल्या तीन दिवसांपासून गंभीर पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या परिस्थितीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः स्वयंपाक, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छता आणि आरोग्यविषयक गरजांवर याचा गंभीर फटका बसला आहे.
स्थानिक आमदार आणि खासदार यांना वारंवार विनंत्या करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही आणि नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. या परिस्थितीत, गरजू नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने स्वीकारली आहे.
संतोषी माता नगर, अंबिकानगर येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्र. 24 मधून नगरसेवकपदाचे उमेदवार राहिलेले सतीश गायकवाड आणि अनुजा अमर जगताप ज्यांना भाजपकडून मतमोजणीत घोळ करून पराभूत केले, यांनी निवडणुकीत विजय मिळाला नसला तरी जनसेवेची बांधिलकी जपत टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.
निवडणुकीत षडयंत्राने पराभव झाला असला तरीही जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहून काम करण्याचा निर्धार या पाणी सेवेतून निश्चित झाला आहे. यावेळी अमर जगताप आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments