Type Here to Get Search Results !

लाखनी तालुक्यातील कोलारी (पटाची) येथे अ.भा. अंनिस तर्फे प्रबोधन कार्यक्रम.

 



पालांदूर पोलिस स्टेशनच्या पुढाकाराने जादूटोण्याच्या आरोपातून निर्माण झालेला तणाव दूर करण्यात अ भा अंनिस समितीला यश


गावकऱ्यांना केले जवळपास दोन तास वैज्ञानिक प्रबोधन


✍️भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847


भंडारा (लाखनी ) :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील लाखनी पासून २३ किमी अंतरावर असलेल्या कोलारी (पटाची)  येथे लहानु सूर्यवंशी या वृद्ध इसमावर मागील १५ दिवसापासून जादूटोणा व वैद्युकीचे आरोप झालेला असताना तो खचून गेला. त्याने मुलाच्या मार्फत पालांदूर पोलिस स्टेशन व लाखनी अ भा अंनिस समितीकडे तक्रार केली. समितीने पालांदूर पोलिस स्टेशन कडे पाठपुरावा केला. दोन्ही बाजूचे बयान पोलिस स्टेशन ने घेतले.


शेवटी FIR न नोंदविण्यापेक्षा गावातील झालेला तणाव दूर करण्यासाठी वैज्ञानिक प्रबोधन कार्यक्रम पोलिस स्टेशन पालांदूर व अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांचे सहकार्याने ग्रामपंचायत  कार्यालयाच्या आवारात सभा काल ११ जूनला रात्रीला घेण्यात आली. सभेच्या अगोदर  ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही गटाची समजूत समितीने काढली यावेळी पोलिस स्टेशन पालांदूर चे नवनियुक्त ठाणेदार सुभाष मुंडे यांनी , कोलारीचे सरपंच उमेश झंझाड,पोलिस पाटील सुनील लुटे,उपसरपंच कमलेश लांडगे, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच अ भा अंनिस समितीचे जिल्हा सचिव मुलचंद कुकडे, जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद जांभूळकर,कार्याध्यक्ष अशोक गायधने, लाखनी तालुका संघटक अशोक वैद्य यांनी प्रमुख भूमिका बजावून मोलाचे सहकार्य केले व गंभीर वातावरण व तणाव मिटविण्यास मदत केली. 


त्यानंतर जिल्हा सचिव मुलचंद कुकडे व जिल्हा उपाध्यक्ष ग्यानचंद जांभूळकर यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग व मार्गदर्शनातून वैचारिक प्रबोधन केले. अनेक गावकऱ्यांचे प्रश्नांचे शंका व समाधान केले.

अशारीतीने अ भा अंनिस जिल्हा शाखेच्या पुढाकाराने व पालांदूर पोलिस स्टेशन च्या सहकार्याने मध्यम मार्ग स्वीकारून मागील १५ दिवसापासूनचा सूर्यवंशी कुटुंबीयांवर व गावकऱ्यांवर आलेला तणाव व संघर्ष दूर करण्यात समितीला यश आले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस पाटील सुनील लुटे यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच झंझाड यांनी केले.

अशा प्रकारे रात्री ९.३० वाजता प्रबोधन  कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी पालांदूर पोलिस स्टेशनचे चार पाच कॉन्स्टेबल व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच समस्यांनी  प्रबोधन सभेत कायदा सुव्यवस्था राखण्यात सहकार्य केले. या गंभीर प्रकरण सुलभ रीतीने हाताळण्यासाठी अ भा अंनिस भंडारा जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे , जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments