Type Here to Get Search Results !

तळा डंपिंग ग्राऊंडची "ऐशी कि तैशी."तहसील कार्यालय रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य.




दुर्गंधी युक्त वासाने नाक मुठीत धरून जावे लागते.

नगरपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर.


किशोर पितळे 

तळा तालुका प्रतिनिधी 


तळा :-तळा दुर्गासागर धरणाजवळ डंपिंग ग्राऊंडचा कचरा तहसील कार्यालयाचे रस्त्यावर टाकला असून दुर्गंधी पसरली आहे.कार्यालयात जाणारे कर्मचारी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरुन जावे लागत आहे. पावसाने संपूर्ण रस्त्यावर आला असून कुजण्याची क्रिया जलद होत असल्याने दुर्गंधी पसरली आहे.आरोग्यावर परिणाम होत आहे.साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे धक्कादायक बाब म्हणजे अंबेळी येथे शासनाच्या निधीतून डंपिंग ग्राऊंडची शेड,कचरा घनकचरा विलगीकरण,विघटन प्रक्रिया सामुग्री व्यवस्था झालेली असूनही धरणाच्या जवळील डंपिंग ग्राऊंड हलवण्यासाठी मुहुर्त कधी लागणार?गेली कित्येक वर्षे असणाऱ्या डंपिंग ग्राऊंड बाबतीत अनेक लेखी तक्रारी आहेत या धरणाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो धनकचऱ्यामुळे पाणी दुषीत होत आहे कचरा जाळून हवा प्रदुषण, दुर्गंधी याचा आरोग्यावर होत आहे याबाबत अनेक तक्रारी असून देखील सुस्त नगरपंचायतीला जाग कधी येणार? खुर्चीत बसलेल्या मुख्याधिकारी यांनी डंपिंग ग्राऊंडवर जावून पहाणी करावी असा सतंप्त सवाल नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments