Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारचा मोठा महत्त्वाचा निर्णय ! खाद्य तेल खरेदी करताना फसवणूक टाळणार !




✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रातिनिधी📱 मो.नं.9373472847 /8888519894


भंडारा : ( दिनांक १७ जून २०२६ ) केंद्र सरकारने खाद्यतेलासाठी मानक (स्टँडर्स) पॅक आकार निश्चित केले आहेत. नव्या नियमांनुसार कंपन्यांना आता केवळ निश्चित परिमाणांच्या पॅकमध्येच खाद्यतेल विक्री करता येणार आहे. यामध्ये २०० मिलीपासून २० लिटरपर्यतच्या नऊ आकारांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँडच्या तेलांच्या किमती व प्रमाण यांची तुलना सहज करता येणार आहे.


खाद्यतेलाच्या पॅकिंगमध्ये सध्या मोठी विसंगती दिसून येते. काही कंपन्या ९०० मिली, काही ९१० मिली, तर काही २५० मिली किंवा १ लिटरच्या पॅकमध्ये तेल विक्री करतात. पॅक दिसायला जवळपास सारखे असले तरी त्यातील प्रमाण वेगळे असल्याने ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते. तसेच, विविध ब्रँडच्या किमतींची तुलना करणेही अवघड जाते. ही समस्या लक्षात घेऊन नवीन नियमांनुसार पॅकवर तेलाचे प्रमाण आणि आकारमान स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे.



*लिटरसोबत खाद्यतेलाच्या वजनही छापावे लागणार*


खाद्यतेलाची घनता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे लिटरमधील प्रमाणासोबत समतुल्य वजनही पॅकेजिंगवर नमूद करावे लागणार आहे.


*प्रत्येक पॅकवर वजन व आकारमान बंधनकारक*


प्रत्येक पॅकवर त्यातील प्रमाण आणि आकारमान स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक राहणार असून, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.


*२०० मिलीपेक्षा लहान पॅकना सूट दिली जाणार*


हॉटेल, विमानसेवा किंवा विशिष्ट वापरासाठी असलेल्या काही श्रेणींना सूट देण्यात आली आहे.


*कंपन्यांना तीन महिन्यांची देण्यात आली मुदत*

केंद्र सरकारकडून नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी उत्पादक आणि पॅकर्सना तीन महिन्यांचा संक्रमण कालावधी देण्यात आला आहे.


खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी एकसमान निकष लागू झाल्यास बाजारातील अनावश्यक स्पर्धा आणि संभ्रम कमी होईल. सुरुवातीला नवीन पॅकेजिंगसाठी काही बदल करावे लागतील.

-- आशिष खेडीकर, किराणा व्यावसायिक, भंडारा.


तेल खरेदी करताना अनेकदा पॅकेटचा आकार पाहून ग्राहक निर्णय घेतात; मात्र दिसायला सारख्या पॅकमध्ये प्रमाण वेगळे असल्याने गोंधळ उडतो. मानक आकार निश्चित झाल्याने ग्राहकांना खरेदीपूर्वीच दर आणि प्रमाणाची अचूक तुलना करता येईल, त्यामुळे खरेदी अधिक सोपी व पारदर्शक होईल.

-- प्रशांत देशभ्रतार, ग्राहक, भंडारा

Post a Comment

0 Comments