Type Here to Get Search Results !

दापचरी नाक्यावर मोठी कारवाई; २१.७१ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त




ह्युंडाई क्रेटामधून महाराष्ट्रात होत होती बेकायदेशीर दारू वाहतूक; आरोपी फरार


अरविंद बेंडगा 

पालघर जिल्हा प्रतिनिधी

7798185755


दादरा आणि नगर हवेली तसेच दमण-दीव येथून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल २१ लाख ७१ हजार ४०० रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवार (दि. १६ जून २०२६) रोजी डहाणू तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर करण्यात आली.


मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका, दापचरी यांच्या पथकाने सापळा रचून ह्युंडाई क्रेटा (क्र. GJ 01 WA 6496) या चारचाकी वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील विदेशी मद्य व बिअरचा साठा आढळून आला.


या कारवाईत ३५७.४८ बल्क लिटर आयएमएफएल (IMFL) आणि ३०० बल्क लिटर बिअर असा एकूण मोठा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हे मद्य दादरा आणि नगर हवेली तसेच दमण-दीव येथे विक्रीसाठी राखीव असून महाराष्ट्रात त्याची विक्री प्रतिबंधित असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.


या प्रकरणी गुन्हा क्रमांक २४/२०२६ नोंद करण्यात आला असून कारवाईदरम्यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे.


सदर कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार आणि अधीक्षक गणेश बारगजे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. निरीक्षक एस. एस. फडतरे, उपनिरीक्षक पी. सी.पाटील, आर. जी. सूर्यवंशी तसेच जवान योगेश अंभोरे, करण दडस, गणेश शितोळे, विठ्ठल शिंदे आणि वाहन चालक महेंद्र पाडवी यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.


या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एस. एस. फडतरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments