Type Here to Get Search Results !

झोन सभापती वैशाली चंदनखेडे यांचा आयुक्तांना 48 तासांचा इशारा

 


चंद्रपूर नाल्यांची सफाई ठप्प, 160 कामगार घरी - साथीच्या रोगाचा धोका

चंद्रपूर, 10 जुलै 2026 : पावसाळा दारात असताना चंद्रपूर महानगरपालिकेने 160 सफाई कामगारांना कामावरून कमी केल्याने शहरातील नाल्यांची सफाई पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्व प्रभागात घाण, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांची भीती वाटत आहे.


ही गंभीर बाब लक्षात घेऊन झोन क्र. 2 च्या सभापती *सौ. वैशाली प्रकाश चंदनखेडे* यांनी आज चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी निवेदन सादर केले.


निवेदनात त्यांनी म्हटले की, "गेल्या 5 दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी पूर्वनियोजन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 61(1) नुसार शहराची स्वच्छता राखणे ही मनपाची वैधानिक जबाबदारी आहे."


*सौ. चंदनखेडे यांनी आयुक्तांकडे 3 ठळक मागण्या केल्या:*

1.  पुढील 48 तासात युद्धपातळीवर सर्व नाल्यांची सफाई सुरू करावी

2.  काढून टाकलेल्या 160 सफाई कामगारांना तात्काळ सेवेत घ्यावे 

3.  पावसाळ्यासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करावा


48 तासात ठोस कारवाई न झाल्यास सर्व नगरसेवकांसह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.


यावेळी शहर अध्यक्ष महिला काँग्रेस सौ. चंदाताई वैरागडे, श्री. वसंतराव देशमुख, श्री. तवांगार खान, सौ. अनिता चावके, सौ. करिष्मा जंगम, श्री. सचिनभाऊ कत्याल , श्री. कुमार पोतलवार, श्री. बंडू जांघडे रमीज शेख  यांची उपस्थिती होती.


मनोज एल खोब्रागडे

   मुख्य संपादक

8208166961/9860020016

Post a Comment

0 Comments