किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
मो. 90285 58529
तळा तालुक्यातील महागांव ग्रामपंचायत तर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व माझी वसुंधरा अभियान 7.0 मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. "वृक्षवल्ली आम्हा सोयरेवनचरे" जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या संत वाणी प्रमाणे माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण वरदायनी मंदिर परिसरात ग्रुप ग्रामपंचायत महागाव वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रशासक तथा विस्तारअधिकारीपुष्पा नेरकर , कृषी विस्तार अधिकारी मुंढे, डॉ.रघुनाथ पोवार ,ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णातांबडे,मंदिराचे ट्रस्टी व सर्व पदाधिकारी,माजी सरपंच विठोबा साबळे ,पोलीस पाटील मांगले, कांतिलाल कसबळे ग्रामस्थ मंडळ,महागाव केंद्रप्रमुख,मुख्याध्यापकमहागाव आदिवासीवाडी सुनील बैकर व ग्रामपंचायत कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थीत होते. सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पुष्पा नेरकर विस्तारअधिकारी
मार्गदर्शन करताना म्हणाल्या कि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज व माझी वसुंधरा अभियान 7.0 मार्फत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येत असुन शासनाच्या उपक्रमाचा उद्देश विस्तृत माहिती दिली ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपनकरावे. त्यांना काठीचा आधार देणे,गुरांपासून संरक्षणासाठी पाँलीकँब कापड किंवा कुंपणाचे संरक्षण दिले पाहिजे पावसाळ्यानंतर पाणी देणे गरजेचे असते पालकत्व स्विकारुन संगोपन करावे वृक्षारोपणामुळे प्राणवायूची कमतरता भरून निघू शकेल जमीनीतील पाणी बाष्पीभवन कमी होईल तसेच सावली मिळेल. पर्यावरण संतुलित राहील उष्णता कमी होण्यास मदत होईल ज्या ज्या ठिकाणी ओसाड माळरानावर गायरान जागेवर वृक्षारोपण करीतआहोत ती सर्व झाडे वाचवा या वृक्षारोपणाचा फायदा नक्कीच भविष्यात चांगला आरोग्याच्या दृष्टीने होईल आपली ग्रामपंचायत तालुक्यातील एकनंबर झाली पाहिजे असे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments