व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधी अहेरी
9209982212
अहेरी प्राणहिता येथे असलेल्या 9 बटालियनचा 88 वा स्थापना दिवस कमांडंट शंभू कुमार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी बटालियनच्या सभागृह व प्रांगणात काल 27 जुलै रोजी साजरा करण्यात आला.
सकाळी सर्व सीआरपीएफ जवानांची परेड घेण्यात आली. यात वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाला जिवंत ठेवण्यात आले. अधिकारी व जवानांनी देशासाठी एकता, अखंडता व सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याने त्याच आदर्श वर बटालियन कार्य करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायंकाळी रंगीबेरंगी सांस्कृतिक कार्यक्रम विविध भाषांमध्ये साजरे करण्यात आले. यात नृत्य, गाणे, कविता व इतर कार्यक्रमांचा समावेश होता. यावेळी काही जवानांचे परिवार सुद्धा उपस्थित होते. कमांडंट शंभू कुमार यांनी अधिकारी जवान व त्यांच्या परिवारांना ८८ वा स्थापना दिनानिमित्त सीआरपीएफ तर्फे अभिनंदन व स्वागत करून हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
यावेळी त्यांनी सीआरपीएफ चा गौरवशाली इतिहास, वीरता,अनुशासन व राष्ट्रसेवा यांचा उत्कृष्ट परंपरेचा उल्लेख करून समर्पण, कर्तव्यनिष्ठता व राष्ट्रभक्तीची भावना जवानांनी निरंतर आपल्या योगदानात ठेवावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात उत्साह, अनुशासन व राष्ट्रभक्तीची भावना सर्वांमध्ये जाणवत होती व प्रेरणा देत होती. यावेळी अधिकारी योगेंद्र डाखोले सुद्धा उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments