Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांची खासदार प्रतिभाताई ने प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी वाहतूक, प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव जी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. 


या भेटीदरम्यान चंद्रपूर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या व सध्या कालबाह्य झालेल्या बसस्थानक ते इंदिरा गांधी चौक रेल्वे उड्डाणपुलाचे तातडीने 'स्ट्रक्चरल ऑडिट' करून तिथे नवीन आधुनिक पुलाची उभारणी करावी, ही प्रमुख मागणी मांडली. तसेच  नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई व पुणे मार्गावर आठवड्यातून किमान ३ ते ४ दिवस विशेष गाड्या सुरू कराव्यात आणि दिल्ली-बंगळुरू राजधानी एक्सप्रेसला चंद्रपूर स्थानकावर दोन्ही फेऱ्यांमध्ये थांबा द्यावा, अशी आग्रही मागणी केली.


यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड व स्थानिक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या यवतमाळ-आर्णी-हिवरा-माहूर-किनवट नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन आगामी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद करावी, याकडे लक्ष वेधले.


या सर्व मागण्यांवर गांभीर्याने विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे व सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन माननीय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments