किशोर पितळे
तळा तालुका प्रतिनिधी
(ता. तळा, जि. रायगड : -गायमुख येथील माजी विद्यार्थी तथा सध्या दक्षिण आफ्रिकेतील Sterling Oil and Gas Company लिमिटेड मध्ये कार्यरत असलेले पुंडलिक परशुराम मोडके व सौ.प्राजक्ता
गायमुख या नवदाम्पत्याने तसेच संतोष जालगावकर (बोरीचामाळ) यांनी सामाजिक बांधीलकी जपत खारीचा वाटा उचलून आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत या शाळेतून शिक्षण घेऊन मोठे झालो. शिक्षकांनी चांगले शिक्षण व संस्कार दिले. त्याचे भान राखून समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून खारीचा वाटा उचलून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व विविध भेट वस्तूंचे वाटप केले. विद्यार्थ्यांना वही,लेखन साहित्य व इतर उपयुक्त वस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.तसेच नवोदय विद्यालय, निजामपूर येथे निवड झालेल्या कुमारी मानसी प्रकाश दुरे हिचा विशेष सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनी मानसीच्या यशाचे कौतुक करीत तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास शाळेतील माजी शिक्षक कृष्णा कांबळे, अमिष भौड, चेतन जगताप व राहुल उगलमुगले यांच्यासह शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावच्या मातीशी जोडलेली नाळ,शाळेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले. माजी विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहात आपली शाळा शालेय व्यवस्थापन समिती सदैव ऋणी राहील असे मुख्याध्यापक अमिष भौड यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments