मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या महाल भागातील निवासस्थानी लोकप्रतिनिधी व नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. 4) पार पडली. यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे, खासदार श्रीमती मायाताई इवनाते, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. मोहन मते,आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार श्री. अनिल सोले, माजी आमदार श्री. विकास कुंभारे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, आयुक्त डॉ. विपीन, नासुप्रचे सभापती श्री. संजय मीना, एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, डीआरएम श्री विनायक गर्ग, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. जिचकार, म्हाडाचे मुख्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, मनपा उपायुक्त श्री. मंगेश खवले यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments