Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

अहेरी देवलमरी रस्त्यावर मोठ्या खड्ड्याचे साम्राज्य




व्येकटेश चालुरकर 

तालुका प्रतिनिधी अहेरी 

9209982212


नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास 


अहेरी तालुक्यातील जनतेचा मुख्य व्यवसाय शेती आहे मात्र येथील जनतेला अजून पर्यंत सुख सोयी मिळाल्या नसल्याने त्यांच्या नशिबी संघर्ष कायम आहे याचेच एक उदाहरण म्हणजे तालुक्यातील अहेरी ते देवलमारी पर्यंत रस्त्याची झालेली दुरवस्था या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापूर्वी   सुरू करण्यात आले परंतु काम अजूनही पूर्ण झालेले नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागांचेअक्षम्य दुर्लक्ष होत आहे अहेरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे अनेक गावातील लोकांना मुख्य बाजारपेठ उपजिल्हा रुग्णालय समितीमध्ये कामासाठी यावे लागत त्यातच तालुक्यातील नागरिकांसाठी देवलमारी ते अहेरी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे तालुक्यातील जनतेला जिल्ह्याचा ठिकाण शासकीय कामासाठी वैद्यकीय सेवा घेण्यासाठी शाळा करी मुलांना शिक्षणासाठी बाजारपेठ जाणे अत्यंत गरजेचं आहे परंतु हा रस्ता अत्यंत खराब झाल्यामुळे नागरिकांना आवाहन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे वर्षभरापासून  रस्त्याचे काम अर्धवट करण्यात आले आहे त्या रस्त्याने जाणे कठीण झाले आहे रस्त्यावरील वर्दळ  वाढल्याने हा रस्ता  पूर्णपणे खड्डेमेय झाला आहे अनेक दुचाकीस्वार अपघात  होत आहे परंतु या रस्त्याच्या  कामाची वाडवीव्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे या समस्याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्यामुळे जनतेला नाहक त्रास भोगाव लागत आहे संबंधित विभागाने या रस्त्याच्या कामाची गती वाढवून वाहनधारकांना दिलास द्यावा अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments