Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

उपमाहापौर श्री प्रशांत दानव व स्थायीसमिती सभापती मनस्वीताई गिऱ्हे यांनी महानगरपालिका शाळांचा केला पाहणी दौरा




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


चंद्रपूर :- आज दिनांक ०९ जुलै २०२६ रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेअंतर्गत रामचंद्र नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.


यावेळी चंद्रपूर मनपा उपमहापौर मा. श्री. प्रशांत दानव साहेब, स्थायी समिती सभापती सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे तसेच संबंधित अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या उपस्थितीत शाळेतील शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधा, स्वच्छता, वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे तसेच इतर आवश्यक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


यावेळी शाळेतील आवश्यक सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार.

Post a Comment

0 Comments