रेशन कार्ड, निराधार, श्रावण बाळ व दिव्यांग पेन्शन योजनांतील वंचितांना तातडीने न्याय देण्याची मागणी
✍️श्री. निलेश सोनवणे✍️
जळगांव जिल्हा प्रतिनिधी
जळगाव तहसीलदार कार्यालयावर दिनांक ७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विविध शासकीय योजनांतील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात धडक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महिला, पुरुष आणि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आंदोलनामध्ये १२ अंकी (NPH) रेशन कार्ड तयार होऊन हमीपत्रासह सर्व कागदपत्रे पुरवठा शाखेत जमा करूनही अनेक महिन्यांपासून धान्य सुरू न झालेल्या लाभार्थ्यांना तातडीने धान्य सुरू करावे, नवीन रेशन कार्ड व १२ अंकी कार्डासाठी अर्ज केलेल्या नागरिकांची कामे त्वरीत पूर्ण करावीत, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना, एकल महिला व विधवा महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ त्वरित मिळावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. भाऊसाहेब सोनवणे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख, जळगाव जिल्हा) आणि प्रमोदभाऊ घुगे (शिवसेना तालुका प्रमुख, जळगाव) यांनी केले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जळगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार राहुल वाघ यांनी स्वीकारले. नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे, युवा सेना तालुका प्रमुख किरण पवार, भगवान धनगर, प्रभाकर कोळी, लोटन सोनवणे, एकनाथ सैंदाने, महेश अहिरे, खुशाल अहिरे, स्वप्नील राजपूत, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, शरद सोनवणे, अरुण कोळी, योगेश घुगे, चंद्रकांत पाटील, योगेश चौधरी, डॉ. रमाकांत कदम, भीमराव पांडव यांच्यासह महिला शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी शासनाने वंचित लाभार्थ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

Post a Comment
0 Comments