Type Here to Get Search Results !

लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडी करणारा आरोपी गजाआड !



एकूण १,४८,०००/हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!


✍️ भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 /8888519894


भंडारा :( लाखांदूर ) (दिनांक २३ जुलै २०२६ ) लाखांदूर पोलिसांनी एका मोठ्या घरफोडीचा छडा लावत अज्ञात आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून १ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याला चोरीचे सोने-चांदी विकत घेणाऱ्या एका ज्वेलर्स मालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


 लाखांदूर येथील फिर्यादी जितेंद्र कुंडलीक ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी त्यांचे कुटुंब शेतावर गेले होते. दुपारी घरात कोणी नसताना अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून अलमारीतील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. फिर्यादीच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ३५४/२०२६) नोंदवण्यात आला होता.


पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपी पंकज नामदेव काळसर्पे (वय ३६ वर्षे, रा. महागाव, जि. गोंदिया, सध्या रा. हरदोली, ता. लाखांदूर) याला २१ जुलै २०२६ रोजी अटक केली.


*चोरीचा माल जप्त*


आरोपी पंकज काळसर्पे याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चोरलेले दागिने कोंढा येथील ‘बाबाजी मस्के ज्वेलर्स’चे मालक बाबाजी रमेश मस्के (वय ४० वर्षे) यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी कारवाई करत ज्वेलर्स मालकाकडून चोरीचे दागिने हस्तगत केले.


जप्त करण्यात आलेला एकूण मुद्देमाल (किंमत १,४८,००० रुपये):


सोन्याची ३.६३० ग्रॅम लगड (किंमत ₹३३,६००)


सोन्याचे २० नग पिटिव मनी (किंमत ₹१३,०००)


चांदीचे ९.४६० ग्रॅमचे जोडवे (किंमत ₹१,४००)


गुन्ह्यात वापरलेली हिरो प्लेझर स्कूटी (क्र. MH 31 DW 8489 – किंमत ₹४५,०००)


 हिरो होंडा पॅशन प्लस मोटारसायकल (क्र. MH 31 CY 875 – किंमत ₹५५,०००)


 न्यायालयीन कोठडी


आरोपीला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय, लाखांदूर यांच्यासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती ज्योतिका इंगळे आणि पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकातील सपोनि आशिष गडदे, पो.हवा. संतोष चव्हाण, पो.अं. ओंकार सपाटे, लंकेश राऊत, अमित उईके आणि निलेश चव्हाण यांनी ही कामगिरी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments