Type Here to Get Search Results !

"लोकांची परवानगी नसेल तर स्मार्ट मीटर बसवू नका!" – आमदार निलेश राणे यांची विधानसभेत ठाम मागणी




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


मुंबई :- स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर राज्यभरातून नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाच, कुडाळचे आमदार निलेश राणे nilesh raneयांनी विधानसभेत हा प्रश्न जोरदारपणे उपस्थित केला.


त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लोकांच्या इच्छेविरुद्ध किंवा परवानगीशिवाय कोणाच्याही घरावर स्मार्ट मीटर बसवू नयेत. अनेक नागरिकांकडून स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या, तसेच विविध अडचणींच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे त्यांनी सभागृहात मांडले.


जनतेचा विश्वास जिंकायचा असेल तर सरकारने आधी नागरिकांच्या शंकांचे समाधान करावे. 


जबरदस्तीने योजना राबवण्यापेक्षा लोकांना संपूर्ण माहिती द्यावी आणि त्यांच्या संमतीनंतरच स्मार्ट मीटर बसवावेत, अशी ठाम मागणी निलेश राणे यांनी केली.


स्मार्ट मीटर खरंच नागरिकांच्या हिताचे आहेत का? की सामान्य माणसाच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत आहेत? हा प्रश्न आता राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे.

Post a Comment

0 Comments