Type Here to Get Search Results !

गडचिरोलीत बाल हृदय तपासणी व मोफत शस्त्रक्रिया उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरणार - मुख्यमंत्री




३०० हून अधिक बालकांची 2D Echo तपासणी; गरजू बालकांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार


मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे  उपस्थिती


मनोज एल खोब्रागडे

  ✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860010016


गडचिरोली : -

गडचिरोली सारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन होणे ही अत्यंत समाधानाची बाब असून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


जिल्ह्यातील बालकांना अत्याधुनिक हृदयरोग निदान व मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे मोफत 2D Echo व बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन आज करण्यात आले इ. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार डॉ श्रीकांत शिंदे हेही दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.


पुढे बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समाजहितासाठी केले जाणारे हे कार्य ईश्वरी कार्य असून अशा उपक्रमांना सातत्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.


सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील बालकांमध्ये जन्मजात हृदयविकारांचे वेळेत निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले. वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत असून गरजू बालकांना आवश्यक त्या सर्व सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूचे विशेष कौतुक केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात येऊन बालकांची तपासणी व उपचारासाठी सहकार्य करणे ही समाजसेवेची प्रेरणादायी भावना असल्याचे सांगत त्यांनी गरजू बालकांच्या पुढील शस्त्रक्रिया व उपचारासाठी शासन व आरोग्य विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिल

Post a Comment

0 Comments