Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट.





त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो.9096817953


नागपूर.भांडेवाडी परिसरातील गणेश ऊर्फ गुरुदेव बोरकर खूनप्रकरणात १६ दिवसांपासून फरार असलेल्या आणखी एका आरोपीला भांडेवाडी पोलिसांनी मौदा तालुक्यातून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अर्जुन प्रशांत पटले (वय २१, रा. बजरंग पार्क, जुनी कामठी, नागपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २ जुलै २०२६ रोजी रात्री गणेश ऊर्फ गुरुदेव प्रितमलाल बोरकर (वय ४५) हे भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळील चहाच्या दुकानातून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.गंभीर जखमी झालेल्या गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताची आई सुशिला प्रितमलाल बोरकर (वय ६२) यांनी भांडेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान मृताची पत्नी मनीषा गणेश ऊर्फ गुरुदेव बोरकर ऊर्फ मनीषा शांताराम पारधी (वय ३७) हिने पतीशी सुरू असलेल्या वादातून खुनाचा कट रचल्याचा संशय पोलिसांना होता.मनीषा ही काही काळापासून मुलांना घेऊन शामनगर, पारडी येथे राहत होती. तिने यापूर्वी पतीला 'तुझा मर्डर करणार तर मीच' अशी धमकी दिल्याची माहितीही तपासात समोर आली.

Post a Comment

0 Comments