Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

सिंदेवाही येथील श्रवण लॉन येथे पंचायत समिती सिंदेवाहीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


सिंदेवाही :- काल सिंदेवाही येथील श्रवण लॉन येथे पंचायत समिती सिंदेवाहीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत विविध विभागांच्या कामकाजाचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.


यावेळी पूर्णत्वास आलेली विकासकामे, प्रलंबित प्रकल्प, नागरिकांच्या समस्या व तक्रारी यावर सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विकासकामांमध्ये गती आणून जनतेच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यावर विशेष भर देण्यात आला.


यावेळी मार्गदर्शन करताना सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.


सिंदेवाही तालुक्याचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या समस्या सोडविणे आणि विकासकामांना गती देणे हीच आपली प्राथमिकता असून, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.

Post a Comment

0 Comments