रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.
तळा-किशोर पितळे-(प्रतिनिधी)
तळा :- रायगड.जि. प.शाळा तळेगाव तळे येथे मा.डॉ.श्री.संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय अलिबाग ) शालेय विद्यार्थ्यांना दंत आरोग्याच्या बाबतीत मार्गदर्शन करताना बोलत होते, यावेळी डॉक्टर संतोष झापकर यांचे मुख्याध्यापक शिंदे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मानवी दाताची रचना व त्याचे कार्य व त्याच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य किती महत्वाचे आहे व कँल्शिअम कमतरता असेल तर दात किडण्याचे प्रमाण अधिक असते दुधाचे दात पडण्यापूर्वी किड लागणे, दुखणे हे याचे लक्षण आहे आईकडून आलेले कँल्शिअमचे प्रमाण कमी असेल तरी देखील हि समस्या निर्माण होते.दात नियमित दोन वेळा ब्रश करणे ब्रश करून झाल्यावर बोटांनी हिरड्यांना मसाज करावा. मुलांनी चाँकलेट,कँडबरी, चिंगम खाणे टाळावे.गरमपदार्थ टाळावे थंड झाल्यावर खावे.जेवण चावून चावून खाणे यासाठी दात चांगले असणे गरजेचे आहे बर्फ,थंडपाणी आईस्क्रीम याचा परिणाम हा दातांवर होतो.सतत तोंडात फोड येणे हे आजाराचे लक्षण आहे.गुटखा तंबाखू जन्य पदार्थ खावू नका जीवघेण्या कँन्सर कर्करोगाचे बळी होऊ नका खाणाऱ्यांना प्रतिबंध करा.जनजागृती करा असे आवाहन करूनआपल्या सुदृढ आरोग्यासाठी दातांची निगा राखणे महत्त्वाचे असते याचे प्रात्यक्षिके करून दाखवले.या प्रसंगी मुख्याध्यापिका स्मृती शिंदे,विजय येलवे,श्रीम.रेखा अकोलकर, तुषार वाडेकर उपस्थित होते.शेवटी विजय येलवे यांनी डॉ झापकर यांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments