Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ओसीडब्ल्यूद्वारे करण्यात आलेल्या कामात झालेल्या खड्यांचे पुनर्भरण करण्यात यावे, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


नागपूर :- पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी गडरलाईन स्वच्छता, नालेसफाई, सर्व सार्वजनिक विहरीची साफसफाई करण्यात यावी, तसेच ओसीडब्ल्यूद्वारे करण्यात आलेल्या कामात झालेल्या खड्यांचे पुनर्भरण करण्यात यावे, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आज (ता. 13) अधिकाऱ्यांना दिले.


महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आशीनगरनगर झोन कार्यालयात नगरसेवक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाळापूर्व कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., वैद्यकीय सेवा आणि आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे,  झोन सभापती श्री.असिफ शेख, नगरसेवविका श्रीमती भावना लोणारे, श्रीमती सोफिया शेख (मांडवा), श्रीमती अलिशा फहीम खान, श्रीमती रेखा पाटील, श्रीमती संगीता पाटील,  श्रीमती सायमा फैयाज कुरेशी, श्रीमती कल्पना द्रोणकर, गट नेता श्री असलम खान मुल्ला,  नगरसेवक सर्व श्री. अभिषेक शंभरकर, श्री. दिनेश यादव,  श्री. मनीष बनसोड, श्री. किरण मनपिया, श्री.पवन कोये, श्री.अंसारी मोहम्मद मुजतबा, उपायुक्त राजेश भगत, श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, श्री. निलेश बोबडे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments