मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पायाभूत विकासकामांच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी जी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या बैठकीत राजुरा-बल्लारपूर परिसरातील राष्ट्रीय महामार्ग (NH 930-D) व राजुरा-हैदराबाद महामार्गाच्या बांधकामामुळे स्थानिक शेतकरी तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महामार्गाच्या उंचीत झालेल्या वाढीमुळे राजुरा येथील शेतकरी बांधवांचा शेतशिवारात जाण्याचा मार्ग बाधित झाला आहे. यावर तातडीचा उपाय म्हणून शेती साहित्य व वाहनांच्या वाहतुकीसाठी अंडरपास आणि सर्व्हिस रोडची निर्मिती करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वर्धा नदी ते कोतपल्लीवार पेट्रोल पंप दरम्यान दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड व ‘एन्ट्री-एक्झिट पॉईंट्स’ उपलब्ध करून देण्याची मागणी केली, ज्यामुळे शेतकरीवर्ग आणि स्थानिक धार्मिक उत्सव व यात्रांमधील भाविकांची गैरसोय टळेल. यासोबतच पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा आणि संरक्षक भिंत उभारणीबाबत केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले.
या व्यतिरिक्त, वरोरा-चंद्रपूर रस्त्याच्या बांधकामातील निकृष्ट दर्जाबाबत तीव्र चिंता व्यक्त करत, सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची ठाम मागणी केली. जनहित आणि शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च मानून प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या बैठकीच्या माध्यमातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वास आहे.

Post a Comment
0 Comments