त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953
उमरेड :- उमरेड चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात निवेदन जिल्हाप्रमुख वैद्यकीय मदत कार्य नागपूर ग्रामीणरमेश महातळे, रामभाऊ शिंगाडे, अनिल पुढे डॉक्टर बाबा मेंडुले, सुखदेव चौधरी,, राज बावनकुळे,, दारासिंग जाधव,, व इतर शिवसैनिक यांच्या वतीने जिल्हा सहआयुक्त विनोद साहेब तथा प्र.अ. नगर पालिका प्रशासन यांना भ्रष्टाचाराची करण्यासाठी दिले निवेदन
उमरेड नगर परिषदेच्या अशिर्वादाने मोठ्या प्रमाणात रोडवर अतिक्रमण झाल्याबाबत. तसेच उमरेड नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत.
वरील विषयान्वये आपणास सविनय निवेदन देण्यात येत आहे की, उमरेड नगर परिषदेच्या आशिर्वादाने उमरेड येथील दुकानदार रोडपर्यत दुकाने वाढवित आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावरून जाणेयेणे करणे कठीण होवून बसले आहे. दोन चाकी गाड्यांना जाण्यायेण्यास फारच अडचण निर्माण होते तसेच चार चाकी गाडीला रस्त्यावरून निघणे फार कठीण होवून जाते. दूकानदाराच्या मनमानी कारभार नगर परिषदेच्या आशिवार्दानेच सुरू आहे. दूकानदारांवर कोणतिही कारवाही करीत नाही. केल्यास थातुरमातुर कारवाई करून काही दिवसांनी जसेच्या तसेच अतिक्रमण तयार झालेले पाहण्यात येते. लोकांना खरेदी करण्यास फार अडचण निर्माण होते. गि-हाईकांना स्वतःची दोन चाकी गाडी लावण्यास सुद्धा जागा उरत नाही. दूर गाडीची पार्कीग करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
1) नगर परिषदेकडून कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. तरी कुत्र्यांची खोटी संख्या दाखवुन खोटे लाखो रूपयाचे बिल काढून भ्रष्टाचार केलेला आहे.
2) रोड व नालीच्या कामात मध्ये सुद्धा ठेकेदाराकडून परसेंट घेवून कामाची चौकशी न करता बीले काढली जातात. कामे निकृष्ठ दर्जाचे केली जात आहे.
3) नाल्या सफाईमध्ये सुद्धा अवाढव्य बील काढल्या जात आहे.
4) प्रत्येक नगर परिषदेच्या शाळेची सफेदी व पेंटीग केलेली असून अवाढव्य बील काढलेले आहे.
5) सिमेंट रोडचे सुद्धा काम निकृष्ठ दर्जाचे आहे. यामध्ये लाखो रूपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे.
6ओला व सुका कचरा नेणाऱ्या गाड्या जास्तीच्या दाखवून बीले काढली जातात.
7) ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या मजुरांना कमी मजुरी देवून जास्तीच्या बिलावर सह्या करून घेतात.
वरील विषयाची तसेच अन्य इतर मुद्द्यांची आपल्या स्तरावरून चौकशी करून दोषी कर्मचारीवर निलंबंधाची कारवाही करण्यात यावी हि विनंती.

Post a Comment
0 Comments