Type Here to Get Search Results !

जंतर मंतर वरील होत असलेल्या उपोषण व आंदोलनाला चंद्रपूरकरांनी आंदोलन करून दिले समर्थन




जंतर मंतर वरती २० तारखेच्या लॉगमार्च वर केलेल्या लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ 


चंद्रपूर येथे महाराष्ट्र बंद ला उस्फुर्त प्रतिसाद 


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक ✍🏻

8208166961/9860020016


चंद्रपूर :- दिल्ली येथील जंतर मंतर वरती गेल्या एक महिन्यापासून सुरु केलेल्या कोक्रोज जनता पार्टीचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्या साठी संपूर्ण भारतातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिल्ली च्या जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांचे आगमन होत असून ही शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नसल्याने 20/07/26 ला संसद भवनावर शांतता पूर्ण मार्च काढण्याचे ठरविले होते परंतु भाजप सरकारने दिल्ली पोलिसांच्या मदतीने विध्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून अमानुष मारहाण करण्यात आली त्या निमित्याने भारतातील सर्व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आलेली आहे.या संतापाचा उद्रेक म्हणून सीजेपी ने परत जोरदार आंदोलन सुरु केले आहे आणि जोपर्यंत केंद्र सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत ते माघार घेणार नाही अशी घोषणा देखील केली आहे.


देशभरात सतत समोर येत असलेल्या पेपर लीक प्रकरणांच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टी (CJP), चंद्रपूर यांच्या वतीने २३ जुलै रोजी तीव्र आंदोलन व बंद पाडण्यात आले. या आंदोलनात व बंद ला जिल्ह्यातील  ठिकठिकाणी युवक -युवतींचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आलाआहे तसेचआंदोलनकर्त्यांनी भाजपा सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आले आणि केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.


विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या या ‘खेळा’ला तात्काळ पूर्णविराम द्यावा, अशी मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गंभीर प्रकरणाची जबाबदारी घेऊन त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे.भाजपा सरकारने विध्यार्थ्यांवर लाठीचार्ज व वांगचुक यांच्या अटकेचा निषेध म्हणून आज चंद्रपुरात बंद पुकारण्यात आले, आणि या बंद ला विध्यार्थी व समस्त नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.


यावेळी चंद्रपूर येथील आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या कथित बेकायदेशीर अटकेचा तीव्र निषेध नोंदविला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवकांवर लाठीचार्ज व अश्रुधूराचा वापर करणे हे लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याचा आरोप करण्यात आला.


या आंदोलनाला चंद्रपूर येथील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा मोठा पाठिंबा लाभला. वंचित बहुजन आघाडी,आम आदमी पार्टी, आझाद समाज पार्टी, भाकप, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) तसेच ओबीसी संघर्ष समिती,  यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शविलेला आहे.

आता परत या मागण्यांकडे भाजपा सरकारने जर दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी करण्यात आला आहे. 


कॉकरोच जनता पार्टीने केंद्र सरकारला इशारा देत पेपर लीक प्रकरणांवर कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना तात्काळ शिक्षा द्यावी, तसेच विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पारदर्शक परीक्षा प्रणाली राबवावी, अशी मागणी केली. युवकांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या वेळी चंद्रपूर येथील आंबेडकर नगर येथे जमा झालेल्या समस्त नागरिकांनी आपआपली उपस्थिती लावली होती.

Post a Comment

0 Comments