Type Here to Get Search Results !

जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगलाला पोलिसांनी घेतले ताब्यात .



त्रिशा राऊत नागपूर जिल्हा क्राईम रिपोर्टर मो 9096817953

नागपूर.जम्मूमधील एका तरुणी बेपत्ता प्रकरणात नागपूर पोलिसांनी जम्मू पोलिसांना मोठी मदत केली आहे. जम्मूहून नागपुरात आलेल्या प्रेमीयुगुलाला संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांनाही पुढील तपासासाठी जम्मूला रवाना करण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील बहू फोर्ट परिसरात राहणारी १८ वर्षीय विवाहित तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी ७ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान संबंधित तरुणी तिच्या पूर्वीच्या परिचयातील एका तरुणासोबत नागपुरात आल्याची माहिती समोर आली.


तांत्रिक तपासाच्या आधारे जम्मू पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. नागपूर पोलिसांच्या सहकार्याने बजाजनगर परिसरातून तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार इमामवाडा परिसरातून तरुणीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील बहू फोर्ट परिसरात राहणारी १८ वर्षीय विवाहित तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी ७ जुलै रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान संबंधित तरुणी तिच्या पूर्वीच्या परिचयातील एका तरुणासोबत नागपुरात आल्याची माहिती समोर आली.


तांत्रिक तपासाच्या आधारे जम्मू पोलिसांचे पथक नागपुरात दाखल झाले. नागपूर पोलिसांच्या सहकार्याने बजाजनगर परिसरातून तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार इमामवाडा परिसरातून तरुणीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.चौकशीत दोघे गेल्या आठ-दहा दिवसांपासून नागपुरातील विविध हॉटेल आणि परिचितांच्या घरी राहून आपले ठिकाण बदलत असल्याचे समोर आले. तरुणाने यापूर्वी नागपुरात शिक्षण घेतले असल्याने येथे लपून राहणे सोयीचे ठरेल, असा त्याचा अंदाज होता.


जम्मू आणि नागपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे प्रकरण उघडकीस आले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी जम्मू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Post a Comment

0 Comments