✍️ दिलीप करकरे ✍️
माणगाव, रायगड
7208708456
माणगाव:- युवा प्रतिष्ठान रायगड (स्थापना २०२२) यांच्या वतीने सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या मालिकेअंतर्गत शैक्षणिक उपक्रमाचे दुसरे पर्व रविवारी (दि. २६ जुलै २०२६) सकाळी १०.३० वाजता रा. जि. प. प्राथमिक मराठी शाळा, कोलमांडले येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणे, सामाजिक बांधिलकीची भावना रुजविणे आणि समाजोपयोगी कार्यात युवकांचा सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, मार्गदर्शन तसेच विविध विषयांवर प्रेरणादायी विचार मांडण्यात आले.
युवा प्रतिष्ठान रायगडतर्फे रक्तदान शिबिर, क्रिकेट स्पर्धा, सामाजिक उपक्रम, तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सामाजिक पुरस्कार व कोकण रत्न पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा असल्याची माहिती संस्थापकांनी दिली.
कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष श्री. अमर शंकर खेरटकर, उपाध्यक्ष श्री. गणेश शिंदे, समाजसेवक व लेखक श्री. विनोद विचारे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच श्री. शंकर खेरटकर (सल्लागार, कुणबी समाज मुंबई), श्री. नितीन जोशी (सरपंच), श्री. संदीप पेंढारी (सदस्य), श्री दशरथ कातकर सर (शिक्षण मार्गदर्शक) श्री. बाळकृष्ण पड्याळ (जिजाऊ संस्था), सौ. सीमा चव्हाण (मुख्याध्यापिका), श्री. राजेंद्र समुद्रे सर, श्री. किरण गांगुर्डे सर, सौ. समिता खेरटकर, अडखळे येथील आशा सेविका तसेच गावातील स्थानिक पदाधिकारी, महिलावर्ग, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी युवा प्रतिष्ठान रायगडच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही समाजहिताचे असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा विश्वास व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments