Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

राजमाता जिजाऊ रुग्णालयात चुकीचं इंजेक्शन दिल्याने सोनम डोंगरे या गर्भवतीचा तिच्या गर्भातील बाळासह दुर्दैवी मृत्यू




मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


मुंबई :- नवी मुंबई ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात चुकीचं इंजेक्शन दिल्याने सोनम डोंगरे या गर्भवतीचा तिच्या गर्भातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला. दुःखात बुडालेल्या घणसोली येथील या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि या कठीण प्रसंगात सोबत असल्याचा विश्वास दिला. एका गर्भवतीचा बाळासह झालेला मृत्यू म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या हलगर्जीपणाने घेतलेला बळी आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह काल रस्त्यावरचा लढा दिल्याने यातील काही दोषींना निलंबित करण्यात आम्ही नक्कीच यशस्वी ठरलो. 


पण राज्यात आणि महापालिकेत दोन्ही ठिकाणी भाजप-शिवसेनेचीच सत्ता असूनही ते नागरिकांना धड नीट आरोग सुविधाही देऊ शकत नसतील तर त्यांनी आपल्या अपयशाबद्दल येथील नागरिकांची माफी मागितली पाहिजे. तसंच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पिडीत कुटुंबालाही भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments