अरविंद बेंडगा
पालघर जिल्हा प्रतिनिधी
7798185755
पंचायत समिती विक्रमगड येथील विस्तार अधिकारी (कृषी) चंद्रकांत नवसा गुहे यांनी प्रदीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेनंतर सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या सेवाकाळात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी, शेतकरी हितासाठी आणि ग्रामीण भागातील विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेला मानवंदना देण्यासाठी चारोटी येथे भावपूर्ण सत्कार व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी चंद्रकांत गुहे यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त, समर्पण आणि साधेपणाचा विशेष उल्लेख केला. अनेक वर्षांच्या निष्कलंक सेवेमुळे त्यांनी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी वर्गामध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले असून त्यांचे कार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या सन्मान सोहळ्यास वेशू गुहे (युट्युब कलाकार), उमेश गुहे (ग्रामसेवक), लक्ष्मण घुटे (शिक्षक), राहुल गुहे (शिक्षक), अरुण गुहे (ग्रामपंचायत सदस्य), देवू गुहे (युट्युब कलाकार), विजय लक्ष्मण गुहे, शंकर दाजी गुहे, अर्जुन गुहे, दामू गुहे, लहु गुहे, संकेत गुहे, रविंद्र गुहे, नरेश गुहे, विजय मधु गुहे, विजय विष्णू गुहे, मंगेश विष्णू गुहे यांच्यासह गुहे परिवारातील अनेक सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी चंद्रकांत गुहे यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि निरामय जीवनाच्या शुभेच्छा देत त्यांना भावपूर्ण निरोप दिला.

Post a Comment
0 Comments