Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

महागांव -तळा तालुका जोडणाऱ्या नदीला पाणी आल्याने जनसंपर्क तुटला.सां बा.विभागाचेअक्षम्य दुर्लक्ष.




तळा-किशोर पितळे-प्रतिनिधी


तळा तालुक्यातील महागांव जवळपास २४/२५कि.मी अंतरावर असून तळा तालुका ठिकाण आहे.हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो.या रस्त्यावरील नदीला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वारंवार पूर येतो त्यामुळे जनसंपर्क तुटतो तालुक्याला जोडणारा पूल कमी उंचीचा असून याबाबत अनेक वेळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाने पत्र देऊन मागणी करूनहि दखल घेतली गेली जात नाही. याबाबत खासदार सुनील तटकरे,आमदार मंत्री अदिती तटकरे यांच्या कडे मागणी करण्यात आली असून समस्या दूर केली नाही.अशी ओरड ऐकायला येत आहे त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे या नदी जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र असून आजारी पेशंट,गर्भवती महीला,जेष्ठ नागरिक वयोवृद्ध यांना उपचारासाठी वेळेवर घेऊन जाता येत नाही. अत्यवस्थ पेशंटला घेऊन नेण्यात अडचणी येत असल्याने दगावण्याची शक्यतानाकारता येत नाही त्याबरोबर रस्ता देखील अरुंद आहे.सदर पुलाची उंची वाढवण्याची मागणी होत आहे तसेच तळा ते महागांव रस्त्याची दुरावस्था झालीआहे.मोठ मोठ्या खड्याचे साम्राज्य खडबडीत रस्ता आणी अरुंद लगत वाढलेली झाडी,वेडीवाकडी वळणे समोरून मोठे वाहन आल्यास साईड पास होताना पन्नास,शंभर फुट वाहने मागे पुढे करण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते. तरी संबधीत विभागाने या गंभीर समस्या दूर करावी अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments