मनोज एल खोब्रागडे
✍🏻मुख्य संपादक✍🏻
8208166961/9860020016
चंद्रपूर : - आज चंद्रपूर येथील नियोजन भवनात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रलंबित कामे, नागरिकांच्या तक्रारी, मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न आणि जनतेसमोरील विविध अडचणी यावर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना अधिक गती मिळावी, प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत आणि नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, यासाठी प्रशासनाने समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मा. वसुमना पंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. पुलकित सिंह, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments