Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) शांतिनगर आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर (UHWC) येथे संयुक्त पाहणी




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

8208166961/9860020016 


नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, सतरंजीपुरा झोनच्या सभापती श्रीमती अभिरुची राजगिरे तथा झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलभा शेंडे यांच्या उपस्थितीत दि. १६ जुलै रोजी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) शांतिनगर आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर (UHWC) येथे संयुक्त पाहणी करण्यात आली.


यावेळी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा, औषधसाठ्याचा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच परिसरातील नागरिकांना सर्व आरोग्य सेवा वेळेवर, गुणवत्तापूर्ण व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.


या प्रसंगी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, सतरंजीपुरा झोनच्या सभापती श्रीमती अभिरुची राजगिरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलभा शेंडे, सौ. मधुर भांडारकर, UPHC शांतिनगर व VHB कॉलनी शांतिनगर UHWC येथील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments