मनोज एल खोब्रागडे
✍️मुख्य संपादक✍️
8208166961/9860020016
फलटण :- फलटणमधील खामगावमध्ये धक्कादायक घटना. विजेच्या शॉकने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चारही जण मृत्यूच्या
विळख्यात सापडले
मृत्यू झालेल्या मध्ये
१)सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे वय45
२) गंगू सतीश शिंदे वय 40
3) सचिन सतीश शिंदे वय 26
४) आरती सतीश शिंदे वय 24
सर्व राहणार साखरवाडी खामगाव येथील निवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी ६ वाजण्याचा सुमारास विजेचा बल्ब काढून लावताना वडिलांना (सतीश) यांना विजेचा झटका लागला त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांची पत्नी आणि २ मुले यांनाही विजेचा झटका बसला आणि एकाच घरच्या चार ही जीव गेले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी एकच गर्दी करून सर्व परिसरात दुःखाची लाट आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी पावसाळ्यात शक्यतो लाईट चे काम करणे टाळावे
आणि अत्यंत गरजेचे असेल तर मेन स्विच ऑफ करुन काम करावे खास करून पाणी भरण्यासाठी मोटारींचा
वापर केला जातो आणि बेसावधपणाने
अनुचित प्रकार घडतात म्हणून विजेचे काम करतांना सावधगिरी बाळगावी अशी परिसरातील लोकांच्या तोंडून निघत होते.
.jpg)
Post a Comment
0 Comments