Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आज महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट




मनोज एल खोब्रागडे 

✍🏻मुख्य संपादक✍🏻

मो.8208166961/9860020016


चंद्रपूर :- महाराष्ट्र भवन, नवी दिल्ली येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन 

ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आज महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेतली.


महाराष्ट्रातील केंद्राच्या ओबीसी यादीत समावेशासाठी प्रलंबित असलेल्या २७ जातींचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, या संदर्भातील निवेदन शिष्टमंडळाकडून स्वीकारले. या विषयाकडे केंद्र सरकार, केंद्राची ओबीसी कल्याण समिती तसेच सरकारचे लक्ष वेधून हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी लोकसभेत आणि केंद्र सरकारकडे ठाम व सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.


ओबीसी समाजाच्या हक्कांशी कोणतीही तडजोड होणार नाही. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा, प्रतिनिधित्व मिळावे आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी माझा संघर्ष आणि पाठपुरावा यापुढेही अविरत सुरू राहील.

Post a Comment

0 Comments