Type Here to Get Search Results !

ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागा मार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व वृक्षारोपण.


तळा -किशोर पितळे- (प्रतिनिधी)


ग्रुप ग्रामपंचायत तळेगाव येथे पशुसंवर्धन विभागामार्फत गुरांचे लसीकरण शुभारंभ व ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपणकार्यक्रमाचे आयोजन १४जुलै २६रोजी करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य गिताताई जाधव,पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर,सरपंचा रेणूका चाळके, सहाय्यक आयुक्त डॉ.संदीप शिंदे पशू वैद्यकीयडॉ निखिल जाधवअधिकारी,ग्रामपंचायत सदस्य सुरेश कदम,दिपक चाळके,रसिका पवार, विठाबाई तळेगांवकर,दिपक चिंचाळकर,गाव अध्यक्ष भगवान शिंदे,पोलीस पाटील किशोरकदम,ग्रामपंचायत अधिकारी रुपाली करबत उपस्थित होते. यावेळी जनावरांचे लसीकरणाचे महत्व शेती पुरक व्यवसायास चालना देण्यात पशुधनाचे महत्त्व आहे त्यांचा सांभाळ करणे पशु मालकाचे कर्तव्य आहे. त्यांना वेळोवेळी तपासणी करून,औषधोपचार करणे, कोणते खाद्य देणे याबाबत मार्गदर्शन करुन पशु क्रेडिट कार्ड बाबतची माहिती डॉ.संदीप शिंदे यांनी दिली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसभापती रवींद्र मांडवकर मनोगत व्यक्त करताना सांगितले की शासनाचा "झाडे लावा झाडे जगवा"उपक्रम राबविण्यात येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासंत वचना प्रमाणे आले."वृक्ष वल्ली आम्हासोयरे वनचरे " प्रमाणे संवर्धन व संगोपन करणे आपलीच जबाबदारी आहे. जिल्हा परिषद सदस्य गिताताई जाधव म्हणाल्या कि वृक्षारोपण करीत असतो पावसाळ्यानंतर पाणी घालणे गुरांपासून संरक्षण करणे आवश्यक असते. तर खऱ्या अर्थाने झाडे जगतील याने हवामान संतुलित राहील उष्णता कमी होण्यास मदत होणार आहे. जमीनीतील पाण्याची पातळी कायम राहील. सावली मिळेल त्याचे पालकत्व ग्रामस्थ व पंचायत प्रशासनाने देखील घेतले पाहिजे असे आवाहन केले.या कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments