Type Here to Get Search Results !

नटराज इंग्लिश हायस्कूलमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन




चंद्रपूर: स्थानिक नटराज इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक ११ जुलै २०२६ रोजी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि सामाजिक जनजागृतीसाठी 'अंधश्रद्धा निर्मूलन' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख श्री पुंडलिक मोतीराम जाधव उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांद्वारे चमत्कारांमागील विज्ञान समजावून सांगितले आणि अंधश्रद्धांना बळी न पडता विवेकवादी विचार करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वंभर सिंग आणि भाजपा कार्यकर्त्या सौ वाणी सदालावार उपस्थित होत्या. त्यांनी समाज सुधारणेमध्ये अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सीमा रवींद्र सरकार यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे किती गरजेचे आहे, यावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पर्यवेक्षक सौ मीना जगन्नाथ मलिक, स्काऊट मास्टर श्री राज निर्मलकर, शिक्षक श्री धृवेंद्र वानखेडे आणि शिक्षिका सौ लक्ष्मी बंडीवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मनोज एल खोब्रागडे 

✍🏻 मुख्य संपादक ✍🏻

मो 8208166961/9860020016

Post a Comment

0 Comments