त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर मो.9096817953
उमरेड.वाहनांवर बसविण्यात आलेल्या अतितीव्र (हाय पॉवर) पांढऱ्या LED / फोकस लाईट्सवर कारवाई करून अपघात टाकल्या साठी रमेश महातळे, रामभाऊ शिंगाडे, अनिल पुढे डॉक्टर बाबा मेंडुले, सुखदेव चौधरी,, राज बावनकुळे,, दारासिंग जाधव,, व इतर शिवसैनिक
अनिल मस्के साहेब अपर पोलिस अधीक्षक यांना दिले निवेदन
वरील विषयान्वये निवेदन सादर करतो की, उमरेड शहर व परिसरातील अनेक चारचाकी, मालवाहू वाहने, ट्रक, पिकअप व इतर वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने अतितीव्र पांढऱ्या रंगाचे LED हेडलाईट्स, फोकस लाईट्स व अतिरिक्त लाईट्स बसविण्यात आले आहेत.
रात्रीच्या वेळी अशा वाहनांचे समोरून येणारे तीव्र प्रकाशकिरण वाहनचालकांच्या डोळ्यांवर थेट पडतात. त्यामुळे काही क्षणांसाठी समोरील रस्ता दिसेनासा होतो, दृष्टीवर परिणाम होतो आणि वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो.
नियमबाह्य LED, फोकस व अतिरिक्त लाईट्स वापरणाऱ्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवावी.
मोटार वाहन कायद्यानुसार दोषी वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी.
नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी.
भविष्यात अशा प्रकारच्या नियमबाह्य लाईट्सचा वापर रोखण्यासाठी नियमित तपासणी करण्यात यावी. नागपूर जिल्हा आपण या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही कराल, अशी अपेक्षा आहे
.jpg)
Post a Comment
0 Comments