Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

मोहाडीत जनसेवा साप्ताहाचा समारोप ! अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने जनतेची सेवा करावी - आमदार राजू कारेमोरे !


✍️भवन लिल्हारे भंडारा,गोंदिया जिल्हा प्रतिनिधी मो.नं.9373472847 / 8888519894


भंडारा (मोहाडी ) : (दिनांक २७ जुलै २०२६ ) जनसेवा पंधरवडा हा केवळ शासकीय उपक्रम नसून शासन आणि जनतेतील विश्वास दृढ करणारा प्रभावी दुवा आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट मिळत असून जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण होत आहे. अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जनतेची सेवा करावी असे प्रतिपादन आमदार राजू कारेमोरे यांनी जनसेवा पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात केले.


जनसेवा पंधरवड्याच्या समारोपानिमित्त मोहाडी येथे आयोजित कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांना देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ३१० लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले, तर नगरपंचायत क्षेत्रातील १३ लाभार्थ्यांना आखीव पत्रिका प्रदान करण्यात आल्या.     

याशिवाय रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी ५० युवकांनी रक्तदान केले. तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, जनता दरबार, विविध शासकीय योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाला आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती आनंद मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सदाशिव ढेंगे, जिल्हा परिषद सदस्य देवा ईलमे, अनिता नलगोपूलवार, महादेव पचघरे, उमेश पाटील, पंचायत समिती सभापती बाणा सवालाखे, उपसभापती आशा बोन्द्रे, पंचायत समिती सदस्य प्रीती शेंडे, देवचंद ठाकरे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी गणेश दिघे, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, गटविकास अधिकारी लिल्हारे, सहाय्यक गटविकास अधिकारी गिरीधर सिंगनजुडे, प्रमेश नलगोपूलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले. संचालन माजी सभापती रितेश वासनिक यांनी केले.

Post a Comment

0 Comments