Type Here to Get Search Results !

जनसंवाद न्यूज

जनसंवाद न्यूज

जंतर-मंतरवरील आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा जाहीर पाठिंबा



मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


 नई दिल्ली :- नवी दिल्लीयेथील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने *अभिजित दीपके* यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या आंदोलनास तसेच सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआस)च्या शिष्टमंडळाने भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

या शिष्टमंडळात विराआसचे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप, युवा आघाडी प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ विभागाध्यक्ष अरुणभाऊ केदार, पश्चिम विदर्भ विभागाध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, प्रचार प्रमुख तात्यासाहेब मत्ते तसेच कोअर कमिटी सदस्य श्रीमती पद्माताई राजपूत यांचा समावेश होता.

यावेळी ॲड. वामनराव चटप यांनी उपोषणस्थळी उपस्थितांना संबोधित करत आंदोलनाच्या उद्दिष्टांचे समर्थन केले. लोकशाही मार्गाने जनहितासाठी सुरू असलेल्या या लढ्याला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा ठाम पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Post a Comment

0 Comments