Type Here to Get Search Results !

निळ्या झेंड्याच्या बाजूचे शिक्षण सम्राटांनी केलेले अतिक्रमण तात्काळ हटवा



औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घुसून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारले प्रश्न 


मनोज एल खोब्रागडे

✍️मुख्य संपादक✍️

8208166961/9860020016


औरंगाबाद :- वाळूज, गंगापूर येथील एका प्रस्थापित शिक्षणसम्राटांनी समता कॉलनी येथील निळ्या झेंड्याच्या बाजूला केलेले अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी भोडवे यांना निलंबित करण्यात यावे व संस्था चालकाचे अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावे, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घुसून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांना जाब विचारला.


वंचित बहुजन आघाडीच्या सर्वसाधारण सभेतील धडकेमुळे अतिक्रमण तात्काळ हटविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांची गाडी अडवून त्यांना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्यावर कारवाई कधी करणार, अशी विचारणा केली.


वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालय येथे आंदोलन केले होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकारी व विस्तार अधिकारी (पंचायत) यांनी २५ जूनपर्यंत अतिक्रमण हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु ते हटविण्यात आले नाही.


मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांना धारेवर धरले. यावेळी त्यांनी "एक दिवसाची वेळ द्या, मी कार्यवाही करते," असे आश्वासन दिले.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, मध्य शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे, युवा आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे, जिल्हा महासचिव सुरज मूळे पाटील, जिल्हा महासचिव इकबाल शेख, शहर महासचिव (मध्य) आनंद शेजुळ, जिल्हा संघटक राजन किर्तने, साहेबराव दाभाडे, गंगापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब दुशिग, शुभम जंगे, ज्योती जाधव, इंदुबाई जंगे, सरला जाधव, संतोष जमदाडे, राहुल हिवाळे, देवा वानखेडे, भास्कर खंडागळे, आलो टोमके, निखिल खरात, सुमित जाधव आदींसह मोठ्या संख्येने महिला, युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments