✍️भवन लिल्हारे भंडारा, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी📱 मो. नं.9373472847 / 8888519894
भंडारा : ( दिनांक १० जुलै २०२६ ) समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी लोकमत मीडिया समूहातर्फे दरवर्षी दिला जाणारा लोकमत भंडारा भूषण अवॉर्ड' यंदा मोहाडी येथील समाजसेवक भूषण गभणे यांना प्रदान करण्यात आला.
नागपूर येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित भव्य सत्कार समारंभात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांतील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे आणि राज्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते भूषण गभणे यांना लोकमत भंडारा जिल्हा भूषण पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
मोहाडी शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेल्या काळात भूषण गभणे यांनी 'जल ही जीवन है' या सामाजिक उपक्रमांतर्गत स्वखर्चाने टँकरद्वारे संपूर्ण शहरात पिण्याच्या पाण्याचे मोफत वाटप करून नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. त्यांच्या या निस्वार्थ समाज सेवेची दखल घेत लोकमत मीडिया समूहाने त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविले.
या सन्मानामुळे मोहाडी शहरासह परिसरातून भूषण गभणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment
0 Comments